सामाजिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन ग्रंथप्रदर्शन,व्याख्यान, ग्रंथवाचन,कथाकथन कार्यक्रम घेवून संपन्न

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन ग्रंथप्रदर्शन,व्याख्यान, ग्रंथवाचन,कथाकथन आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम कुसूमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले. सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. सकाळी ०७ ते दुपारी ०५ पर्यंत ग्रंथप्रदर्शन घेण्यात आले.सकाळी ८ ते ९ या वेळात ग्रंथवाचन,९ ते १० या वेळेत कथाकथन, १० ते ११ या वेळात व्याख्यान घेण्यात आले.

सकाळी ८ ते ९ या वेळात आनंद गायकवाड,यशराज भोगजकर,दिव्या साबळे, कल्याणी घोगले,अमर पौळ,वेदिका गायकवाड यांनी ग्रंथवाचन केले.९ ते १० या वेळात सोहम गायकवार,विक्रम गायकवाड,आनंद गायकवाड,कल्याणी घोगले,वेदिका गायकवाड,यशराज भोगजकर,हरिओम गायकवाड,दिव्या साबळे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी कथाकथन केले.

१० ते ११ या वेळात रामकृष्ण तात्या गायकवाड,कमलाकर साबळे,वेदिका गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.११ ते १२ या वेळात अध्यक्षीय समारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. अध्यक्षीय समारोपात त्यांनी कुसुमाग्रज यांचे चरित्र व मराठी साहित्या तील त्यांचे योगदान या विषयी सविस्तर विवेचन केली.कुसुमाग्रज यांची जयंती मराठीभाषा गौरव दिन म्हणून साजरी होत असल्याचे सांगून मराठी भाषेला शब्दधन देण्याचे कार्य कुसुमाग्रज यांनी केल्याचे सांगीतले.

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात एक, जाणतो मराठी,येवढ्या जगात नाव,मानतो मराठी तसेच अमृतातेही पैजा जिंके,ऐसी अक्षरे मेळवीन ही मराठी भाषेतील शब्दांची ताकद असल्याचे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. सकाळी ७ ते ५ पर्यंत ग्रंथप्रदर्शन चालले.या सर्व कार्यक्रमाला विद्यार्थी – विद्यार्थिनी, युवक – युवती,जेष्ठ नागरीक,महिला यांची उपस्थिती होती.ग्रंथ प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!