सामाजिक

दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी

सोशल मीडियाच्या माध्यमातून दलित समाजाबद्दल अत्यंत खालच्या भाषेतआक्षेपार्ह पोस्ट करून जातीय भावना दुखावल्या प्रकरणी आणि एका व्यक्तीला धमकावल्या प्रकरणी केज पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.रोहन उत्तम गलांडे रा. चिंचोलीमाळी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

याप्रकरणी लखन व्यंकट हजारे वय ३६,रा. भिमनगर,केज यांनी फिर्याद दिली आहे.या फिर्यादीनुसार,दि.१७ फेब्रुवारी रोजी लखन हजारे यांनी रोहन गलांडे याला दि.१ जानेवारी रोजी केलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी रोहनने माफी मागून पुन्हा असे करणार नाही असे सांगितले होते.

मात्र,दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहनने पुन्हा आपल्या फेसबुक अकाउंटवरून आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर (उदा. SG-1 मराठी न्यूज,वंचित बहुजन आघाडी,दिव्य लोकप्रभा वाचक समूह) दलित समाजाचा अपमान करणारी आणि महिलां बद्दल अत्यंत अश्लील मजकूर असलेली पोस्ट व्हायरल केली.इतकेच नव्हे तर,त्याने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून फिर्यादी लखन हजारे यांचे नाव घेऊन त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस कारवाई

या प्रकारानंतर लखन हजारे यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रोहन गलांडे याच्यावर खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे

भारतीय न्याय संहिता (BNS),२०२३ कलम ३५६(२), ३५२, ३५१(३), ७९,१९६ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ कलम ३(१)(r) आणि ३(१)(s) या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, सोशल मीडियावरजातीय द्वेष पसरवणाऱ्यां विरुद्ध कडक पावले उचलली जात आहेत.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!