शैक्षणिकसामाजिक

परिसर स्वच्छ करून कुंबेफळ शाळेत संत गाडगेबाबा जयंती साजरी.   

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्रकेज मुलांची ता.केज शाळेत संत गाडगेबाबा जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून अभिवादन केले.संत गाडगेबाबांचा जन्म २३फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला.ते समाजसुधारक, कीर्तनकार व आधुनिक संत होते.त्यांचे पुर्ण नाव डेबुजी झिंगरोजी जाणोरकर होते.

कीर्तना तून समाजप्रबोधन केले.”तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी” हा संदेश देऊन अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व जाती भेदावर टीका केली. त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावोगावी जाऊन स्वच्छता करत होते. त्यांच्या मातीचे गाडगे पाठीशी असल्याने त्यांना गाडगेबाबा म्हटले जाते. असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले. संत गाडगेबांबानी ग्राम स्वच्छता केली.

त्यांनी टाळासाठी दगडांचा उपयोग करून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन कीर्तन करून समाजप्रबोधन केले.त्यांनी समाजास स्वच्छता संदेश दिला. असे या शाळेतील गणित विज्ञानचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर यांनी सांगुन सविस्तर माहिती दिली.प्राथमिक पदवीधर श्री.डॉ.रामकिशन ग्यानबा मुळे सर,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री. आबासाहेब तुळशिराम धपाटे सर,श्रीमतीअंजली गोविंदराव उटीकर मॅडम, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.

या कार्यक्रमास पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार,अनिता पवार,अंगणवाडी ताई, मदतनीस, सर्व शिक्षक, शिक्षिका वृंद,विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थीनी सिध्दी विजय थोरात यांनी केले.शेवटी आर्या अमोल थोरात यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!