बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ग्रामपंचायत साबला येथे उत्साहात साजरी.

केज/ प्रतिनिधी
मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ग्रामपंचायत साबला येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमास ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत मराठी पत्रकारितेतील योगदानावर प्रकाश टाकला. समाजजागृती, शिक्षण प्रसार आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेची परंपरा निर्माण करण्यामध्ये जांभेकरांचे मोलाचे योगदान असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी सेवा सहकारी सोसायटी, साबला चे चेअरमन उत्तमराव काकडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, श्रीमंत नाईकनवरे, राजेभाऊ काकडे, ज्ञानोबा परळकर, महादेव काकडे, लखन राऊत, उद्धव नाईकनवरे, जालिंदर मुळे, लक्ष्मण काकडे, वसंत नाईकनवरे, नरहरी काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या आदर्शांचा समाजाने अवलंब करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत साबला यांच्या वतीने करण्यात आले असून, शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



