सामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी.

केज/ प्रतिनिधी

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय विश्रामगृह केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव विजय बिक्कड, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, कार्याध्यक्ष नंदूलाल मिसाळ, पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष विश्वास राऊत, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग कसबे, पत्रकार अशोक नागरगोजे, पत्रकार लिंबराज गायकवाड तसेच पत्रकार हिराचंद काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव केला. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळख असलेल्या जांभेकर यांनी समाजप्रबोधनासाठी पत्रकारिता हे प्रभावी माध्यम म्हणून वापरले. त्यांच्या कार्यातून सत्य, निर्भीडता आणि समाजहिताची पत्रकारिता कशी असावी याचा आदर्श आजही पत्रकारांसमोर आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कसबे व आभार प्रदर्शन नंदूलाल मिसाळ संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांनी समाजहिताच्या आणि नीतिमूल्य जपणाऱ्या पत्रकारितेची बांधिलकी व्यक्त केली. या कार्यक्रमाला पत्रकार व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!