

केज/प्रतिनिधी
दि.२६ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानांकन प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळां साठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAFमुल्यांकनासाठी scert-data.web.app ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. सन २०२४-२५ मध्ये राज्या तील१,०२,६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. सन २०२४-२५ मध्ये स्वयं मूल्यांकनामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांपैकी सन २०२५-२६ मध्ये १०७१२ शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली होती.
त्यापैकी १०६४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले.यात़ बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज या तीनही शाळांना स्वयं मूल्यांकन व त्रयस्थ व्यक्तींकडून केलेले बाह्य मूल्यांकन यात सर्वाधिक गुणप्राप्त होऊन (अ+प्लस) श्रेणी प्राप्त झाली आहे.राज्यातील ४० शाळांमध्ये या तीनही शाळा असून नुकतेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आंबेजोगाई च्या वतीने शाळेस अभिनंदनचे पत्र प्राप्त झाले आहे.
दर्जा प्राप्त झाल्यानंतर शाळेच्या दर्शनी भागात नामफलकाचे अनावरण केज गट शिक्षणाधिकारी श्री.सुनील केंद्रे यांच्या करण्यात आले या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,साने गुरुजी निवासी विद्यालय केज ही शाळा प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवत असते त्या उपक्रमात जीव ओतून प्रदर्शन करून प्रत्येक पारितोषिक आपल्या शाळेला कसे मिळेल या दृष्टीने आपला प्रदर्शन करते या मुळे येथील सर्व कर्मचारी अतोनात परिश्रम करून सहभाग नोंदवत असतो याचा प्रत्यय मला नेहमीच येतो.
आपल्या सर्व समुहाच्या मेहनती मुळे शाळेने आपला दबदबा निर्माण केला आहे.कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेत साने गुरुजी निवासी विद्यालयाचा चमु चमकलेला असतो या मुळे या परिवाराचे मनापासून कौतुक करुन अभिनंदन करतो असे मत व्यक्त केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अँड. उद्धवराव कराड, उपाध्यक्ष राजेश कापसे, संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता गित्ते-कराड मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



