सामाजिक

युसूफ वडगाव येथे श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५१ युवकांचे रक्तदान

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसूफ वडगाव येथे श्रीराम नवमीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि स्व.मेजर शिवराज खरबड यांच्या स्मरणार्थ आधार युवा मंचच्या वतीने आयोजित या शिबिरात १५१ युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.युसूफ वडगाव चे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून गेल्या १४ वर्षां पासून आधार युवा मंच च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.याच परंपरेचा भाग म्हणून बुधवारी दि.२५ मार्च रोजी गावातील हनुमान मंदिरात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

सकाळी शिबिराची सुरुवात झाल्यानंतर गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश गिरवत एकूण १५१ युवकांनी यावेळी रक्त दान केले.ग्रामीण भागात अशा प्रकारे मोठ्या संख्येने युवकांनी पुढे येऊन रक्तदान केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

१४ वर्षांची अखंड परंपरा

स्व.मेजर शिवराज खरबड यांच्या स्मृती जपत आधार युवा मंचने ही सेवाभावी परंपरा कायम ठेवली आहे.हे शिबिर यशस्वी करण्या साठी आधार युवा मंच च्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरा तील आरोग्य यंत्रणेला रक्ताचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे.या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!