शैक्षणिकसांस्कृतीक

केज येथील चाईल्ड प्रायमरी स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

केज/प्रतिनिधी

केज शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था चाईल्ड प्रायमरी स्कूल,केज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली.शाळेच्या प्रांगणात शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी,  शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शरद गिराम सर हे होते. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून आदर्श शासन प्रणाली उभी केली. त्यांच्या शौर्य,दूरदृष्टी, शिस्त आणि संघटन कौशल्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. “शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ इतिहास नसून ते प्रेरणादायी मार्गदर्शक आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिक पणा,धैर्य आणि देशभक्ती ही मूल्ये आपल्या जीवनात रुजवावीत,” असे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षणा सोबतच संस्कारांचे महत्त्व ही अधोरेखित केले.शाळेच्या सचिव पूजा गिराम यांनी प्रास्ताविक करताना शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. जिजाऊंच्या संस्कारांमुळेच शिवराय घडले,असे नमूद करत त्यांनी पालकांनीही मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवावेत,असे आवाहन केले.शिवाजी महाराजांच्या प्रशासन कौशल्य, स्त्रीसन्मान व धर्मनिरपेक्षतेच्या विचारांचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साखरे सर यांनी प्रभावीपणे केले.त्यांनी शिवजयंतीचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत विविध कार्यक्रमांची माहिती प्रेक्षकांना दिली. विद्यार्थ्यांच्या सादरी करणांना जोड देत त्यांनी कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.यावेळी विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून आकर्षक सादरीकरण केले.काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊ, मावळे यांची वेशभूषा साकारली होती. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रा वर आधारित भाषणे सादर केली तसेच देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तपसे,पुरी, राऊत,मुसळे,चटप व भंडारे या शिक्षक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या उत्साहपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासा बद्दल अभिमान व प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!