सामाजिक

अमृत बीड जिल्हा कार्यालयात समस्त ब्राह्मण संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांची सदिच्छा भेट ; योजनांबाबत सविस्तर चर्चा

बीड/प्रतिनिधी

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता मजदुर संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री.धनंजय कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम व समाजोपयोगी कार्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री.विशाल जोशी यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती देत सांगितले की,अमृतच्या योजनांचा मुख्य उद्देश समाजातील दुर्लक्षित व लाभापासून वंचित घटकांपर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणे हा आहे.

शिक्षण,कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी अमृत संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.श्री.धनंजय कुलकर्णी यांनी अमृतच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की,अमृतच्या योजना या समाजाला योग्य दिशा देणाऱ्या असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा अशा उपक्रमांमुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध होतात व विकासाचा मार्ग प्रशस्त होतो.माझ्या परीने संपूर्ण महाराष्ट्रात अमृत योजनांना मी नेहमी पाठबळ देत आलो असून पुढेही विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणार आहे.

योजनांचा लाभ घेऊन समाजातील कुटुंबे सक्षमपणे उभी राहावीत यासाठी आणखी नवीन योजना तसेच कर्ज उपलब्धतेसंदर्भात बँकांचे सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

अमृतसंस्थेच्या उपक्रमांना आपण नेहमीच सकारात्मक पाठबळ देत राहू,असे आश्वासन देत समाजातील लोकांनी अमृतच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी संवाद साधताना केले.

या प्रसंगी श्री.धनंजय कुलकर्णी यांच्यासोबत श्री.शिवराज मुथळे हे देखील उपस्थित होते.अमृत बीड जिल्हा कार्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी अमृतचे जिल्हा उप व्यवस्थापक श्री.दिगंबर जोशी,अमृतसखी श्रीमती मनीषा टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!