देशभरात जनगणनेला सुरुवात दोन टप्प्यात देशात होणार जनगणना – प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी
पंधरा वर्षानंतर देशव्यापी नव्या जनगणनेचीप्रक्रिया दि.१ एप्रिल २०२६पासून सुरू झाली आहे.यापूर्वी २०११ मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यामुळेच देशाच्याविविध धोरण निर्मितीसाठी जनगणना २०२७ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.जनगणना दोन टप्प्यात होणार असून जनगणना करताना नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार असल्याची हमी केंद्र सरकारने दिली आहे. लिव्ह इन जोडप्यांना विवाहित मानले जाईल. राष्ट्रीय निबंधक व जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत नागरिकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन केले आहे. जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते ती माहिती च्या अधिकाराच्या कायद्या अंतर्गत दिली जाऊ शकत नाही.
नागरिकांची माहिती न्यायालयात पुरावा म्हणून ही वापरली जाऊ शकत नाही.कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेला ही माहिती दिली जात नाही फक्त आकडेवारीच वापरता येते असे जनगणना आयुक्त नारायण यांनी स्पष्ट केले.जनगणनेसाठी कोणतीही कागदपत्रे वा पुरावे गरजेचे नाहीत नागरिकांनी जशी माहिती दिली तशी स्व घोषणानुसार नोंदवली जाईल.पहिल्या टप्प्या साठी ३३ प्रश्न निश्चित केले आहेत उदाहरणार्थ घराचा प्रकार व स्थिती, बांधकाम साहित्य, कुटुंबातील सदस्यसंख्या, सुविधा व मालमत्ता, वाहनाची माहिती इत्यादी पहिल्या टप्प्यात घर यादी व गृहगणना होईल.
दि.१ एप्रिल पासून नोंदणी सुरू होईल दि. १६ एप्रिल पासून घराघरात जाऊन माहितीचे संकलन केले जाईल.यामध्ये घराची स्थिती पाणी,वीज, स्वच्छतागृह, यासारख्या सुविधा घरातील मालमत्ता यांची माहिती गोळा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना होईल लोकांची सविस्तरमाहिती घेतली जाईल.वय, शिक्षण,व्यवसाय स्थलांतर इत्यादी बाबी नोंदवल्या जातील.ही जनगणना पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे.
प्रथमच नागरिकांना ऑनलाइन माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन,वेब पोर्टलद्वारे नियंत्रण, डिजिटल डेटा थेट उपलब्ध,ही याची मुख्य वैशिष्ट्ये असतील डिजिटल जनगणनेमुळे २०२७ मध्येच जनगणने संदर्भातील काही आकडेवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तरी देशातील राज्यातील जिल्ह्यातील, तालुक्यातील,गावातील जनतेने जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे व सत्य माहिती सादर करावी असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



