
केज/प्रतिनिधी
जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाईच्या वतीने शिक्षक मुल्यवर्धन 3.0 तालुकास्तरीय प्रशिक्षणाचा शेवटचा पाचवा टप्पा साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केजचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलताना म्हणाले की,मुल्य हे उपजतच असतात.त्यांना फक्त वर्तनातून बाहेर आणणे गरजेचे असते.
मुल्यांची रुजवणुक ही स्वतः पासूनच करावी. आताच्या पिढीत व मागच्या पिढीत बराच फरक संस्कार व संस्कृती या मध्ये दिसतोय पुर्वी शिक्षणाबरोबरच संस्कार व संस्कृती शिकायला मिळायची त्यातून आपोआपच मुल्यवर्धन व्हायची त्यामुळे चांगला वाईट यांची कळत न कळत जाण व्हायची. गुरुची मोठ्या व्यक्ती बद्दलची आदरयुक्त भीती असायची ती आता दिसत नाही.कारण कुठेतरी मुल्यच विसरली जातायत की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे.
आजच्या पिढीला शिक्षण खूप असेल पण मुल्यहीन संस्कार हीन असेल त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी मुल्याधिष्ठित सुसंस्कृत पिढी घडवणे आहे.तसेच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे,शिंदे सर, प्रा.डॉ.कविता कराड मॅडम यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी मंचावर उपस्थित केंद्र प्रमुख केदार सर, मदने सर,मुथा फाउंडेशन चे चंद्रकांत मुंडे हेउपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन तारळकर सर यांनी तर आभार मुंडे सर यांनी मानले.



