
केज/प्रतिनिधी
महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला नागरिक वैतागले असुन सौंदना येथील शेतकरी आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौंदना तालुका केज येथील बनसारोळा फिडर महावितरण कंपनीचा मनमानी कारभार चालू आहे.मांजरा नदी काठच्या डीपी,पोलच्या तारा व सर्व पोल पाण्याच्या पुरामुळे मोडून पडलेले आहे तरी त्याकडे कुठलाही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही.
त्यांच्याकडे विचारणा केली असता वारंवार दुर्लक्ष केले जात आहे सर्व शेतकऱ्यांनी मिळून डीपी आंबेजोगाई डिव्हिजनला नेऊन टाकला आहे तरीआमच्या कडे डीपी शिल्लक नाही तुम्ही बाहेरून प्रायव्हेट भरून घ्या अन्यथा एक महिना लागेल असे सूचना केली जात आहे तरी सर्व सौंदाना येथील शेतकऱ्यांचा हाताशी आलेला ऊस वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्याच्याकडे कुठलाही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही.
त्यामुळे अधिकाऱ्याची मनमानी वाढली आहे तरी ताबडतोब येथील प्रतिनिधींनी लक्ष घालून अधिकाऱ्यांना आवर घालून शेतकऱ्याचा लाईटचा डीपी तात्काळ देण्यात यावा अन्यथा महावितरण कार्यालय व लोक प्रतिनिधींच्या विरोधात आमरण उपोषण आंदोलन लवकरात लवकर उभारले जाईल याची नोंद घ्यावी असा इशारा सौंदना ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



