कृषीसामाजिक

कापूस व सोयाबीनच्या हमी भावासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 25 डिसेंबर रोजी निघणाऱ्या शेतकरी हक्क मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे – प्रा.बबनराव आंधळे

बीड / प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्या तील शेतकऱ्याचे मुख्य पीक समजले जाणारे कापूस सोयाबीन पीक आहे या पिकाचे अतिवृष्टी मुळे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्याने शेतात केलेला खर्च निघतो की नाही ? अशी अडचण शेतकऱ्याला निर्माणझाली आहे उत्पादन खर्चात वाढ झाली मात्र शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कोसळले त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे कापसाला आणि सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यां मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

शासनाने कापसाला दहा हजार रुपये व सोयाबीन ला सात हजार रुपये भाव जाहीर करावा अशी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्या कडून मागणी होत आहे. शासनाकडून हमीभाव जाहीर करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी हक्क मोर्चाचे आयोजन केले आहे.

त्यासाठी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बैठका घेऊन असे आवाहन ही करण्यात आले आहे की, गुरुवार दिनांक २५ डिसेंबर रोजी बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून निघणाऱ्या भव्य शेतकरी मोर्चात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोठ्यासंख्येने हजर राहावे असेआवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!