सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केजमध्ये सामाजिक व प्रबोधन पर्वाचे आयोजन; भव्य रक्तदान शिबीर, व्याख्यान आणि प्रबोधन कार्यक्रमांची रेलचेल

केज/प्रतिनिधी

केज येथील उप जिल्हा रुग्णालय आणि पंचायत समिती मैदान परिसरात आगामी काळात विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य रक्तदान शिबीर,फळवाटप, व्याख्यान आणि प्रबोधन पर कार्यक्रमांचा समावेश असून,केज तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजक दिपक भाऊ कांबळे युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शुक्रवार,१० एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर व फळवाटप कार्यक्रमाची सुरुवात १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०-०० वाजता उप जिल्हा रुग्णालय, केज येथे होईल.या दिवशी भव्य रक्तदान शिबीर व रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन डॉ.दत्तात्रय केंद्रे अधीक्षक,उप जिल्हा रुग्णालय केज आणि श्री.संदीप मांजरमे सहाय्यक पोलिस उप निरीक्षक,केज पोलीस स्टेशन यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बुधवार,१५ एप्रिल रोजी प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान

१५ एप्रिल रोजी बुधवारी सायंकाळी ५-०० वाजता पंचायत समिती मैदान, केज येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी उद्घाटक श्री.विष्णू भाऊ घुले मा. सभापती,पंचायत समिती केज,अध्यक्षपदी श्री.दिपक भाऊ कांबळे तालुकाध्यक्ष,रि.पा.इ.हे असणार आहेत.यावेळी केजतालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार १६ एप्रिल रोजी भीमशाहीर आयु.राहुल जी अन्वीकर यांचा प्रबोधन कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५-०० वाजता पंचायत समिती मैदान येथे राष्ट्रीय प्रबोधनकार भीमशाहीर आयु.राहुल जी अन्वीकर यांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न होईल.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आयु.पप्पूजी कागदे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, रि.पा.इं आठवले गट हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विष्णू भाऊ घुले हे असणार आहेत.यासर्व कार्यक्रमासाठी जिल्हा भरातून भीम सैनिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी असणार आहे. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीते साठी आयोजन समिती सह तालुक्यातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या कार्यक्रमांना केज व परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!