सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर केज पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न,डीजे वाजविण्या वर पुर्णपणे बंदी 

केज/प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमी वर केज पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीमध्ये जयंती उत्सव शांततेत, उत्साहात आणि नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मिरवणुकीत डीजे आणि कर्णकर्कश आवाजावर पूर्णपणे बंदी असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संकेत सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी स्वच्छता आणि सोयी सुविधांचे आश्वासन केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांनी दिले.मिरवणूक मार्गावर आणि शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.तसेच डॉ. हारुणभाई इनामदार यांनी जयंती निमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी आणि मिरवणुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा नगर पंचायत तर्फे पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दारूबंदी आणि सामाजिक सलोख्यावर भर देऊन त्यांनी शांततेत जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जयंती च्या काळात शहरात दारूबंदीची कडक अंमलबजावणीकरण्याचा निर्णय प्रशासनाकडून

घेण्यात आला. महामानवाचे विचार आत्मसात करून समाजात सलोखा कायम राखत ही जयंती साजरी करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी मिळून केला.या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!