बोरगाव बु.येथील आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच यांच्या वतीने भाविकांना शिवरात्री निमित्त मोफत फराळ वाटप

केज/प्रतिनिधी
सामाजिक भान ठेऊन तळागाळापर्यंत आपले काम पोहचावे ह्याच उद्दिष्टाने आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच गेली अनेक वर्षे निःस्वार्थ भावनेने मनात यत्किंचितही किंतू परंतु न ठेवता सामाजिक सलोखा जपत आली असून त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र उत्तरेश्र्वर पिंपरी येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी मोफत फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडीत असून समाजा तील सर्वच जाती धर्मा तील युवकांचा व वृद्धांचा फाऊंडेशन व मंचाच्या उपक्रमांना यशस्वी पाठिंबा मिळत आहे. निःस्वार्थ भावनेने सेवा घडावी व सामाजिक समतोल राखण्यासाठी आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच कायम कटिबद्ध असेल असे फाऊंडेशनचे सचिव व मंचचे अध्यक्ष श्री. दिपक रमेश होळकर यांनी म्हटले.
हा उपक्रम राबविण्याची संकल्पना ॲड.श्री.उत्तरेश्वर बाबुराव निंगुळे ह्याची असून ती यशस्वीपणे पार पाडण्या करिता श्री.समाधान गाते यांनी अथक परिश्रम केले असून त्यास प्रतिसाद म्हणून गोविंद पोपळगट,अजय पोपळगट,शंभू वीर, बाळकृष्ण निंगुळे,पवन बोऱ्हाडे,विष्णू निंगुळे यांनी अपर मेहनतीतून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला.तसेच सोमनाथ निंगुळे,नवनाथ गाते या ज्येष्ठनागरिकांनी मोलाचे मार्गदर्शन केले व निखिल मुसळे यांचे व्यवस्थापनाचे व विशेष उत्तम कौशल्य या उपक्रमास लाभले.
श्री.औदुंबर शिंदे यांनी या उपक्रमास हातभार म्हणून साबुदाणा एक कट्टा तसेच शेंगदाण्याचे योगदान दिले,श्री. शामराव फाटक,श्री.राम फाटक यांनी केळी वाटपासाठी सहकार्य केले.सदरील उपक्रम श्री. गोपाळ देव निंगुळे श्री.खंडोबा देवस्थानचे वसारीधारक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या ज्यांनी ह्या उपक्रमास हातभार लावला त्यांचे आभार आरंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.ॲड.योगेश दिलीप चांगण यांनी मानले.



