येवता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,येवता येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेम पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या निमित्ताने शाळेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री.गिते सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्या नंतर राष्ट्रगीत व ध्वज गीताने परिसराचा परिसर भारावून गेला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय जोगदंड व इतर,तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील ग्राम विकास अधिकारी सोनवणे साहेब,सरपंच श्री.विलासअप्पा जोगदंड, उपसरपंच श्री.बाळासाहेब सक्राते व इतर मान्यवरांचे मार्गदर्शन आणिउपस्थिती लाभली.या प्रसंगी श्री.मधुकर इनामदार सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले. शाळेतील सहशिक्षक वृंद: श्रीमती सोळंके मॅडम, श्रीमती लबडे मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्रीमती पठाण मॅडम,श्री.येवतेकर सर, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस,आरोग्य सेविका, आशाताई, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद केवळ शाळा प्रशासनच नव्हे,तर गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी आणि भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. लोकशाहीच्या रक्षणाची शपथ घेऊन आणि भारत माता की जय घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.



