मौजे कोल्हेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
दि.१८आॕगष्ट २०२५ रोजी ह.भ.प.ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड (गुरुजी)श्रीक्षेत्र भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ,यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला मौजे कोल्हेवाडी ता.केज येथील अखंड हरिनाम सप्ताह,वर्ष ३२ वे दिनांक ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावर्षीच्या सप्ताहाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे,श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होय.भागवताचार्य ह.भ.प.श्रीराम महाराज चोले यांच्या मधुर वाणी तून गावकऱ्यांना सर्व प्रथम भागवत कथा श्रवण करण्याचे भाग्य लाभले.विशेष करून या भागवत कथेला महिला मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच तरुण युवकांनी यावर्षीच्या या कार्यक्रमात वाढता सहभाग नोंदवला.
परंपरेनुसार याही वर्षी व्याकरणाचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड (गुरुजी)यांचीकाल्याच्या कीर्तनाची सेवा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादा नंतर सप्ताहाची सांगता झाली.



