सामाजिक

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते ग्राम पंचायत कोल्हेवाडी येथील पिठाच्या गिरणीचे उद्घाटन संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यात विविध उपक्रमात अग्रेसर असणारी ग्रामपंचायत म्हणून कोल्हेवाडी ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने तालुक्यात नाविन्य पूर्ण उपक्रमांतर्गत गावातील कुटुंबांना ग्रामपंचायतची माफक अशा दरात धान्य दळण्याची सुविधा सुलभ व जलद व्हावी व प्रत्येक कुटुंबाने आपला ग्राम पंचायतचा कर वेळेवर भरून नाविन्यपूर्ण अशा सुविधेचा लाभ घ्यावा.या उद्देशाने ग्रामपंचायतने या पिठाच्या गिरणीची उभारणी केली आहे. आदर्श ग्रामपंचायत पाटोदा (छत्रपती संभाजी नगर ) येथील माजी सरपंच भास्कर पेरे यांच्या ग्रामपंचायतीच्या धर्तीवर कोल्हेवाडी ग्रामपंचायतने या गिरणीची उभारणी केली आहे.

या पिठाच्या गिरणीचे उद्घाटन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.२३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.भास्करराव पेरे पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की, छोट्या ग्रामपंचायत ला अनुदान कमी असते, कुटुंबांनी ग्रामपंचायतचा वेळेवर कर भरून नाविन्य पूर्ण अशा योजनेचा लाभ घेतला पाहिजे.गावामध्ये पाणी अडवले पाहिजे, प्रत्येक महिलां-पुरुषांनी एक झाड लावले पाहिजे. गावामध्ये स्वच्छता अभियान राबवले पाहिजे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करा.म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना संभाळा! त्यांना जीव लावा असे तेम्हणाले

या पिठाच्या गिरणीमुळे कोल्हेवाडी गावातील शेतकरी,महिला व सर्व सामान्य नागरिकांनामोठा दिलासा मिळणार असून गावाच्या स्वावलंबनाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. राठोड साहेब (सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती केज),श्री. रोडेवार साहेब (विस्तार अधिकारी, पंचायतसमिती केज) तसेच श्री.महेंद्र धाकपाडे ( ग्रामपंचायत अधिकारी) सरपंच, ग्रामसेवक उपसरपंच सदस्य,शिक्षक कर्मचारी वृंद,व पंचक्रोशीतील महिला भगिनी व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!