सामाजिकसांस्कृतीक

कराड भगिनी यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमा वेळी केली महिलांची आरोग्य तपासणी, उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक 

केज/प्रतिनिधी

दि.२४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू महिलांच्या स्नेह मिलन कार्यक्रमातून साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.कविताताई कराड मॅडम व सौ. वैशालीताई कराड मॅडम यांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात माननीय नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महिलांचे बीपी,वजन तपासणी करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबवण्यात आला तसेच वारकरी संप्रदायाचा दिंडी सोहळा देखावा साकारून अध्यात्मिक संस्कृतीचे दर्शनही घडवून आणले.

या उपक्रमात आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांचा बीपी चेक करताना विद्यार्थिनी व आयोजिका डॉ.कविताताई कराड तसेच आमदार ताईंनी दिंडीत पावले खेळून त्याचाही आनंद घेतला. या सामाजिक उपक्रमाचे सर्व महिला भगिनींकडून कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे, नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,उप नगराध्यक्षा सौ.शितलताई दांगट,सौ. शैलजाताई इंगळे,तांबवा गावच्या सरपंच सौ दिपालीताई चाटे,सौ. इंगळे मॅडम व असंख्य महिला भगिनींनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल प्राचार्या सौ.कविताताई कराड व सौ.वैशालीताई कराड यांनी महिलांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!