टाकळी येथे आ.नमिता मुंदडा यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

केज/प्रतिनिधी
टाकळी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये प्रमुख विकासकामे पुढील प्रमाणे आहेत.ओ डी आर ७५ टाकळी ते पाचंबा वस्ती रस्ता – २ कोटी ४ लाख रुपयांचे कामाचे उद्घाटन करण्यात आले.
आर डी एस एस योजने अंतर्गत टाकळी गावठाण फिडर सेपरेशन व नवीन रोहित्र बसविण्याचे काम होणार आहे.टाकळी येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण – १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे युवा नेते विष्णूभाऊ घुले यांनी केले.यावेळी विविध गावा साठी मागण्या मांडण्यात आल्या.त्यामध्ये विविध रस्त्यांची दुरुस्ती,तलावा तील गाळ काढणे, गावातील सार्वजनिक ठिकाणी सभा मंडप उभारणे,टाकळी फाटा ते चिंचोलीमाळी रस्त्यावरील खड्डे बुजविणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता या सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावू,असे आ.नमिताताई मुंदडा यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.
या कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष श्री.भगवान केदार,श्री.डॉ.वासुदेव नेहरकर,ज्येष्ठ नेते श्री.नेताजी पापा शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री.राहुल भैय्या गदळे,श्री.रामकृष्ण काका घुले,श्री.रघुनाथ बप्पा बारगजे, व्यंकट आप्पा बारगजे,श्री.सुरज भैय्या घुले,दिनूभाऊ घुले, टी.पी.घुले,ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अनिता कदम,हरिदास घुले,जीवन शिरसाट,मल्हारी बारगजे गुरुजी,महादेव घुले, जीवन बारगजे,राम घुले,संतोष घुले,अशोक बारगजे, दिगंबर मुंडे,नितीन बारगजे,सुरज घुले, दिनकर बारगजे,सिद्धेश्वर बारगजे,प्रकाश बारगजे यांच्यासह केज तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते,पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,चेअरमन,तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



