नेत्रतज्ज्ञ डॉ.दत्तात्रय नेहरकर यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन,अंबाजोगाई रुग्णालयात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून होती ओळख

केज / प्रतिनिधी
केज तालुक्यातील पिसेगाव येथील नामांकित नेत्रतज्ज्ञ डॉ.दत्तात्रय नेहरकर यांचे दि.७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता केज येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुखःद निधन झाले.डॉ.नेहरकर यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अनेक वर्षे अत्यंत निष्ठेने आणि सेवाभावी वृत्तीने नेत्रतज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा बजावली होती.त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात आणि अंबाजोगाई-केज, बीड परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ.नेहरकर यांच्या पार्थिवावर बुधवार,दि.८ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या पिसेगा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळी,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाच वृत्त समजताच परिसरावर शोककळा पसरली आहे. शांत,संयमी व्यक्तीमत्व यामुळे ते सर्व परिचित होते.



