सामाजिक

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ; केज पंचायत समितीत बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित,प्रदिप गायकवाड यांच्या दोन महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील नागरिकांच्या कामकाजात होत असलेली दिरंगाई, अधिकारी वेळेवर कार्यालयात न येणे, नियमित हजेरी न लावणे, आठवड्याच्या सह्या एकदाच करून निघून जाणे,अवघ्या एक तास कार्यालयात बसणे अशा विविध कारणांमुळे पंचायत समिती केज येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती.

या गंभीर प्रश्ना विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत तालुका स्तरावर आंदोलन छेडले होते.पंचायत समितीतील अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने सामान्य नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी केज च्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन दिले होते.तसेच, अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला होता.या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने दोन महिने पाठपुरावा वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रवक्ते प्रदीप गायकवाड यांनी केला.जर पंचायत समितीत तात्काळ बायोमेट्रिक प्रणाली बसवली नाही,तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू,असा इशारा ही वंचितच्या वतीने देण्यात आला होता.

अखेर या लढ्याला यश येत पंचायत समिती केज येथे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बसवण्यात आली आहे.त्यामुळे यापुढे अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतील आणि नागरिकांच्या कामकाजात पारदर्शकता येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग येत नागरिकांना न्याय मिळाल्याची भावना तालुक्यातील नागरिकां तून व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी पत्रकार बांधवानी बातम्या लावुन प्रसिद्धी दिली होती मागणी पूर्णत्वाला गेल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!