चांगले रस्ते,शाळा,शुध्द पाणी ही गावाच्या विकासाची ओळख – खा. बजरंग सोनवणे टाकळी ता.केज येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

केज/प्रतिनिधी
चांगले रस्ते,शुद्ध पाणी, वीजपुरवठा व बालकां साठी अंगणवाडी सुविधा, दर्जेदार शाळा ही गावाची खऱ्या विकासाची ओळख असल्याचे प्रतिपादन खा. बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले.ते केज तालुक्यातील टाकळी येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.यावेळी ते बोलत होते.
गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी तसेच भविष्या तील पिढीसाठी दिशा देणारी ही कामे टाकळी च्या प्रगतीच्या वाटचाली तील महत्त्वाचा टप्पा असल्याचे खा.सोनवणे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी टाकळी ते पाचीअंबा वस्ती रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले असून,या मार्गामुळे दळणवळण सुलभ होणार आहे.तसेच गाव अंतर्गत स्मशानभूमीचा विकास,दलितवस्ती व कदमवाडी येथेअंगणवाडी खोली बांधकाम,शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाणी फिल्टर बसविणे, गावासाठी २४ तास गावठाण लाईट फिडर सुविधा सुरू करण्यात आली आहे.
इजगर लवन तलाव येथे नवीन थ्री फेज रोहित्र (डी.पी.)बसविणे, लक्ष्मी आई मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम,मैनाजीच्या वस्तीला जाणारा सिमेंट रस्ता तसेच केज ते धनवाडा (भगवानबाबा वस्ती) रस्त्याचे मजबुती करण व खडीकरण अशी विविध कामे लोकार्पित करण्यात आली.या विकासकामांमुळे महिला, शेतकरी बांधव,विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवक कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.



