टाकळी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याचे आज आयोजन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध विकासकामांचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दि.१९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.ग्रामविकासा च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या कामांमुळे नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यात टाकळी ते पाचीअंबा वस्ती रोड,गावांतर्गत स्मशानभूमी विकास, दलितवस्ती येथे अंगणवाडी खोली बांधकाम,पाणी फिल्टर बसविणे, कदमवाडी येथे अंगणवाडी खोली बांधकाम,गावासाठी २४ तास गावठाण लाईट फिडर,इजगर लवन तलाव येथे नवीन थ्री फेज रोहित्र (डी.पी.),लक्ष्मी आई मंदिर येथे सभा मंडप बांधकाम,मैनाजीची वस्ती कडे जाणारा सिमेंट रस्ता तसेच केज ते धनवाडा (भगवानबाबा वस्ती) रस्त्याची मजबुती व खडीकरण आदी विकासकामांचा समावेश आहे.या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कार्यालय टाकळी यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या विकासकामांमुळे टाकळी गावाच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.



