सामाजिक

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी रंजित घाडगे तर केज तालुकाध्यक्ष पदी दिनकर जाधव यांची निवड

केज/प्रतिनिधी

जय भारत हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रासह संपुर्ण भारत देशात गेल्या आठ वर्षापासून पत्रकारांसाठी आणि पिडित,शोषित, वंचित घटकासाठी आविरत काम करणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) या संघटनेची बीड जिल्हाध्यक्ष,सचिव आणि केज तालुका कार्यकारणी जाहिर करण्यातआली.संस्थापक अध्यक्ष तथा संपादक विजय सुर्यवंशी यांच्या आदेशाने दि.१५ जानेवारी रोजी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे कोअर कमिटी सदस्य दत्तात्रय मुजमुले आणि रंजीत घाडगे यांच्या मार्गदर्शना खाली बैठक संपन्न झाली.

यावेळी दत्तात्रय मजमुले यांनी बीड जिल्हाध्यक्ष पदा साठी रंजीत घाडगे यांची फेरनिवड करत अनिल वैरागे जिल्हा सचिव पदी, उपाध्यक्षपदी सुग्रीव क्षिरसागर यांची निवड करण्यात आली.केज तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये केज तालुकाध्यक्ष पदी दिनकर जाधव यांची निवड करण्यात आली, तर सचिव पदी सचिन भालेराव, कोषाध्यक्ष पदी मनोराम पवार,उपाध्यक्ष पदी जयद्रथ गायकवाड, सहसचिवपदी जयपाल रोकडे,उपाध्यक्षपदी किशोर गरुड यांची निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!