सामाजिक

देवगाव येथे सैनीकाचा सत्कार संपन्न,सुभेदार मेजर ऊत्रेश्वर मुंडे लवकरच कॅप्टन होतील – हनुमंत भोसले सर  

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील देवगाव येथील भुमिपुत्र ऊत्रेश्वर (अण्णा) महिपती मुंडे यांचीनुकतीच सुभेदार मेजर पदी पदोन्नती झाली आहे.त्यामुळे देवगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, याप्रसंगी प्रथम सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन पुजन केले, सुभेदार मेजर पदी निवड झाल्याबद्दल श्री.ऊत्रेश्वर अण्णा मुंडे व त्यांच्या सुविध्य पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ऊत्रेश्वर अण्णा मुंडे म्हणाले की, देशसेवा हि ईश्वर सेवा असुन तरुणांनी इतर विचार न करता देश सेवे साठी तत्पर राहावे प्रमुख मार्गदर्शक म्हणून हनुमंत भोसले सर हे होते.

प्रास्ताविक फौजी सुभाष मुंडे यांनी केले तर भाजपाचे नेते रमाकांत बापु मुंडे,मा.जिल्हा परिषद सदस्य विजयकांत भैय्या मुंडे, जेष्ठ विधीज्ञ अँड.नवनाथ मुंडे, कॅप्टन राम नागरगोजे यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच अतुल दादा मुंडे,प्रभाकर नागरगोजे,राजाभाऊ नागरगोजे,डी.एल नागरगोजे,विठ्ठल मुंडे, छंदर मुरकुटे,अँड.सुदर्शन मुंडे, अॕड.सौ.राजश्रीताई मुंडे,रामेश्वर नागरगोजे, माऊली मुंडे,संजय मुंडे सर,बालासाहेब मुंडे सर, बंडु मुंडे सर,फौजी गब्बर गायकवाड,सुमंत मुंडे, रामहरी मुंडे,चांगदेव मुंडे, महादेव ढाकणे,बालु मुंडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे सर, घोळवे मॅडम आदी ग्रामस्थ उपस्थित होते, सुत्रसंचलन संतोष बाबा मुंडे यांनी केले तर शेवटी सर्व ग्रामस्थांचे ऊत्रेश्वर अण्णा मुंडे यांनी आभार मानले.अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!