सामाजिक

साबला येथे स्वच्छता अभियान संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील साबला येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान माझं गाव माझी मायभूमी निमित्त सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ जानेवारी रोजी स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले.यावेळी उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रतिभा काकडे, ज्ञानेश्वर पांचाळ,ग्राम पंचायत कर्मचारी गुलाब मुळे,विश्वनाथ नाईकनवरे तसेच जि.प.प्रा.शाळा, साबला मुख्याध्यापक धनंजय धाट,सहशिक्षक लोंढे.जि.प.प्रा.कटारे वस्ती,साबला मुख्याध्यापक लोकरे सहशिक्षिका श्रीमती बनसोडे मॅडम,जि.प.प्रा. शाळा,आनंदवाडी वस्ती,साबला मुख्याध्यापक श्रीमती आंडिल मॅडम सहशिक्षक लांडगे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच श्रीमती राधाबाई काकडे,राजेंद्र सरवदे यांच्यासह सर्वांनी मिळून साबला गावातील श्री उत्तरेश्वर महाराज जागृत्त देवस्थान,श्री हनुमान महाराज देवस्थान, श्री संतशिरोमणी सावता महाराज देवस्थानपरिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच साबला गावातील सर्वत्र ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्याचे काम साबला येथील आदर्श सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!