दैनिक वादळ महाराष्ट्र वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
केज शहरातील नव्याने सुरु झालेले परखड व पुरोगामी विचाराचे वृत्तपत्र दै.वादळ महाराष्ट्र या वृत्तपत्राचा केज येथे प्रकाशन सोहळा कार्यालयाच्या समोर उत्साहात संपन्न झाला,या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेल्या केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,प्रमुख पाहुणे जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हारुणभाई इनामदार,मा. जिल्हा परिषद सदस्य विजयकांत भैया मुंडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे,श्रीकृष्ण नागरगोजे, माजी उपनगराध्यक्ष दलील भाई इनामदार,माजी नगराध्यक्ष कबीर भाई इनामदार,डॉ. जलालोदिन इनामदार ,सय्यद हाजीहूसेन मोहा,राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गटाचे शहर अध्यक्ष तथा केज नगर पंचायतीचे नगरसेवक अजझर भाई इनामदार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. शितलताई लांडगे,उबाठा शिवसेना गटाचे जिल्हा सचिव रोहित कसबे,
राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गटाचे केज तालुका उपाध्यक्ष प्रीतम भैय्या चंद्रकांत खरात,मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक हाजी आजिमोदिन, मुमताजोद्दीन खतीब, छावा संघटनेचे शिवाजी दादा ठोंबरे,दलित चळवळीतील कार्यकर्ते शरद धिवार,लखन हजारे, मझरोदीन खतीब,मुन्ना खतीब तसेच सर्व पत्रकार बांधव सर्व पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर कला क्रीडा विश्व समितीचे सर्व पदाधिकारी व दैनिक वादळ महाराष्ट्रचे सर्व प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल वैरागे यांनी केले व आभार प्रदर्शन हाजी आजिमोद्दीन यांनी केले. या प्रकाशन सोहळ्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



