क्रिडाशैक्षणिक

चेन्नई येथे पार पडलेल्या  २२ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत  महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा विद्यार्थिनींचे दैदीप्यमान यश 

केज/प्रतिनिधी

दि.५ ते ७ जानेवारी २०२६ रोजी तामिळनाडू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विद्यापीठ,चेन्नई येथे भारतीय जंपरोप असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या २२ वी सब जुनिअर राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.या स्पर्धेत भारता तील विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतींमध्ये बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्यालय,बनसारोळा येथील खेळाडूंनी आपले नैपुण्य आणि कौशल्य दाखवून दिले.

वैभवी सोनके,आरती जोगदंड, मुक्ताई पारेकर,पल्लवी गोरे यांनी डबल टच स्पीड रिले सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले.तर वैयक्तिक फ्री स्टाईल प्रकारात आरती जोगदंड कांस्यपदक पटकावले आहे.प्रशिक्षक मनेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेले कठोर परिश्रम या यशाचे मुख्य कारण ठरले.

या स्पर्धेतील विजेते खेळाडू आता चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भागवतराव दादा गोरे, सचिव डॉ.नरेंद्र काळे, मुख्याध्यापक बाबासाहेब काकडे व सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!