अध्यात्मिक

केज येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन व महाविष्णू यागाचे भव्य आयोजन

केज/प्रतिनिधी

केज शहरातील भगवान श्रीकृष्ण आश्रम,बीड रोड केज येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन व भव्य महाविष्णूयाग (यज्ञ) तसेच रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांची संगीतमय रामकथा व कीर्तन महोत्सव यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.हा धार्मिक सोहळा बुधवार दि.११ मार्च २०२६ रोजी प्रारंभ होऊन गुरुवार दि.१९ मार्च २०२६ रोजी सांगता होणार आहे.या महायज्ञाचे आयोजन भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री

भगवान श्रीकृष्ण आश्रम, केज यांच्या वतीने करण्यात आले असून, हिमालयातील महान तपस्वी ऋषी-मुनींच्या साधनेच्या परंपरेनुसार हा याग संपन्न होणार आहे. सकल विश्वाच्या कल्याणा साठी,सुख-शांती,समृद्धी व आध्यात्मिक उन्नती साठी हा महाविष्णू याग करण्यात येत असल्याचे ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांनी प्रतिनिधी सोबत वार्तालाप करताना

सांगितले.कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामकथाकार परमपूज्य रामराव महाराज ढोक यांची सुमधुर संगीत रामकथा व कीर्तनसोहळा होणार आहे.यागकाळात दररोज सकाळी ८ ते ११ व यज्ञविधी,मंत्रोच्चार व सायंकाळी ८ ते १० किर्तनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत.

या धार्मिक महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यागाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजक भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. यज्ञासाठी भाविकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी,असे कळविण्यात आले आहे.केज शहर व परिसरातील भाविकांमध्ये या भव्य धार्मिक आयोजनाने उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!