शैक्षणिकसामाजिक

डॉ.सुरेश कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी प्रदान

केज/प्रतिनिधी

केज येथील लोकनेते बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले सुरेश अर्जुनराव कांबळे यांना रसायनशास्त्र विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजी नगर यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजलीजाणारी पीएचडी हीपदवी प्रदान केली आहे

डॉ.सुरेश कांबळे यांनी “फार्माकोलॉजिकल स्टडी ऑफ सम हेटरो सायकलीक कंपाउंड विथ स्पेशल रेफरन्स टू सोल्युट – सॉलवंट इंट्रॅक्शन्स” या विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन प्रबंध सादर केला होता. हा प्रबंध प्रोफेसर डॉ. सुजात कादरी,मौलाना आझाद महाविद्यालय छ. संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केला.या मौखिक परिक्षे साठी अध्यक्ष रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुनील शंकरवार यांनी तर बाह्य परिक्षक म्हणून कामरून विद्यापीठ नैनिताल येथील प्रोफेसर डॉ.शाह राज अली यांनी काम पाहिले.

डॉ.सुरेश कांबळे यांच्या या यशाबद्दल अंबा सहकारी साखरकारखाना अंबाजोगाईचे चेअरमन रमेशराव आडसकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या सौ. अर्चनाताई आडसकर, प्राचार्य डॉ.माधवराव फावडे,उपप्राचार्य डॉ. अनिल किर्दंत,अधिक्षक पी.एस.भोसले,डॉ.अनिल गायकवाड, डॉ.सुवर्णकार, डॉ.शितोळे,डॉ.वेदपाठक व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!