जिल्हा काँग्रेस कमिटी कडून बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने, मनरेगा बचाव आंदोलनात घोषणाबाजी

केज/प्रतिनिधी
केंद्र शासनाने मनरेगा बाबतचा घेतलेला चुकीचा निर्णय हा मजुरांच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे.पूर्ववत असलेला मनरेगा कायदा योग्य होता.तो टिकून राहिला हवा यासाठी मनरेगा बचाव आंदोलन.बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करत मनरेगा बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत मनरेगा बचावचा नारा देण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव तथा मराठवाडा प्रभारी श्रीमती रेहना चिस्ती,प्रदेश सरचिटणीस आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे,रेखाताई चव्हाण,दादासाहेब मुंडे, गणेश राऊत, नवनाथ थोटे,प्रवीणकुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे,प्रताप मोरे,बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे,पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव,आष्टी तालुकाध्यक्ष फारुख शेख,परळी तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे, विशाल मस्के,इलियास टेलर, शहराध्यक्ष परवेज कुरेशी,महिलाजिल्हाध्यक्ष मीनाक्षी पांडुळे,युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेद्रे,एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अविनाश दोरपी,इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमले,अमोल पाठक,संतोष निकाळजे, डॉक्टर दिलीप मोटे, नगरसेवक वाजेद कुरेशी, अशोक बहिरवाल,हनुमान घोडके,राम शेळके, मुशर्रफ शेख,कविताताई कराड,साळवे मॅडम, नौशाद शेख,सतीश गायकवाड,लक्ष्मण पवळ, सोफियान शेख,साजिद कुरेशी,सय्यद फारुख, इम्रान आतार,मिलिंद मस्के,शिवाजीराव कोठुळे,बाळासाहेब जाधव,भाऊसाहेब ढोणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



