सामाजिक

ई बसडेपो व इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरला मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार,केज विकास संघर्ष समिती सह पत्रकारांच्या प्रदीर्घ लढ्याला यश

केज/प्रतिनिधी

केजला बसडेपो सुरु करावा या मागणीसाठी गेली अनेक वर्षे केज विकास संघर्ष समितीसह पत्रकार बांधव यांनी शासनाकडे विविध आंदोलने व निवेदनाच्या रूपाने पाठपुरावा करत होती.यासाठी समितीने दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेऊन पाठ पुरावा केला होता.मंत्री महोदयानी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाहीचे आदेशही दिले होते.केज भेटीमध्ये मा.मंत्री महोदयाची गाडी आरक्षित बसडेपो जागे जवळ थांबवून त्यांना तातडीची कार्यवाही करण्याची विनंती केली होती.अलीकडील काळात केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नाची ही या कामी मोठी साथ मिळाली आहे.

आता केज शहरासाठी ई बसडेपो मंजुरीमुळे केज च्या प्रवाशांना मोठा फायदा होईल तसेच केज च्या वैभवात मोठी भर पडणार आहे.लांब पल्याच्या बसगाड्या तसेच इमर्जन्सी बससेवा केज येथून उपलब्ध करणे शक्य होणार आहे. कोणत्याही समस्यांचा पाठपुरावा करून त्या शासन व समाज दरबारी मांडण्यासाठी सामाजिक संघटना आवाज उठवत असतात,त्या सोडवण्याचे काम प्रशासन,जबाबदार लोकप्रतिनिधीचे च असते. केज विकास संघर्ष समितीने गेली अनेक वर्षे या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,परिवहन मंत्री तसेच स्थानिक आमदार यांचे केज विकास संघर्ष समितीने आभार व्यक्त केले आहेत.

सध्या केज शहर अंतर्गत महामार्गा वरील वाहतूक कोंडी व अपघात तातडीची मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे यापुढे केज ची महत्वाची समस्या रिंगरोड (बायपास) किंवा उड्डाण पूल यापैकी केज वासियांना सोयीचे व फायद्याचे होईल तोपर्यायी रस्ता केज शहराला उपलब्धकरून देण्यासाठी समिती आपला लढा सूरु ठेवणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार बजरंग बप्पा सोनवणे व आमदार नमिताताई मुंदडा यांनी विशेष लक्ष घालून सहकार्य करावे अशी मागणी समितीच्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे,शेषराव घोरपडे इंजिनिअर मोहनराव कराड,संपत वाघमारे,महेश जाजू यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!