न्यायालयीनसामाजिक

ॲड.अक्षय अनिल चाटे यांचे ऑल इंडिया बार परीक्षेत सुयश

केज/प्रतिनिधी

केज तालुक्याचे सुपुत्र अ‍ॅड.अक्षय अनिल चाटे यांनी नुकतीच पार पडलेली ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (All India Bar Examination) यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.देशपातळी वरील या महत्त्वाच्या व प्रतिष्ठित परीक्षेत मिळवलेले यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि चिकाटीचे फलित आहे.

ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण होणे हे देशभरात वकिली व्यवसाय करण्यासाठी अत्यावश्यक मानले जाते. ही परीक्षा कायद्याचे सखोल ज्ञान,व्यावहारिक कौशल्य आणि व्यावसायिक नैतिकतेची कसोटी पाहणारी असते. या कठीण परीक्षेत यश मिळवून अक्षय चाटे यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.अक्षय चाटे यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सातत्याने अभ्यासावर भर दिला.वरिष्ठ वकिलांचे मार्गदर्शन,नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले.त्यांच्या या यशाबद्दल केज तालुक्यातील नागरिक, मित्रपरिवार,नातेवाईक तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशामुळे केज तालुक्यातील युवकांना प्रेरणा मिळाली असून, कायद्याच्याक्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अक्षय चाटे हे प्रेरणास्थान ठरत आहेत. भविष्यात समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी ते निष्ठेने कार्य करतील , असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अ‍ॅड.अक्षय अनिल चाटे यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल आई उर्मिला चाटे,वडील अनिल चाटे, बहिण पूजा चाटे,शिल्पा चाटे,मामा दिनकर मुंडे (एरिया मॅनेजर एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर) वडमाऊली लोकविकास मंचचे संस्थापक भास्कर मुंडे, बंधू लोकमंच प्राईम न्यूजचे संपादक विजय बिक्कड,डॉ.प्रदीप मुंडे, गणेश मुंडे,यश मुंडे मित्रपरिवार व नातेवाईक सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!