राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत वेदांत चौरे यश, केजच्या विद्यार्थ्यांचा बहुमान

केज/प्रतिनिधी
मध्यप्रदेश अमॅच्युअर आर्चरी असोसिएशन यांच्या वतीने दि.१० ते ११ जानेवारी २०२६ रोजी सिंगरौली येथे आयोजित १६ वी मिनी पंधरा वर्षांखालील व बाल तेरा वर्षांखालील व दहा वर्षांखालील राज्यस्तरीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेत सागर जिल्ह्याचे उदयोन्मुख तिरंदाज वेदांत विष्णू चौरे जन्मतारीख १९ जुलै २०१६ याने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. इंडियन राउंड/रिकर्व्ह/कंपाऊंड प्रकारात वेदांत यांनी अचूक नेम साधत पदकाची कमाई केली.
स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभात वेदांत यांला प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय,प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.वेदांत हा केज येथील डॉ.सुरेश बिक्कड यांचा नातु आहे.



