जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केवड येथे जेष्ठ पत्रकार दिलीपराव सपाटे यांची सदिच्छा भेट ; शिक्षकांनी केले स्वागत

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केवड येथे श्री.दिलीपराव सपाटे (मुंबई मंत्रालय, पत्रकार) यांनी नुकतीच भेट देऊन शाळेच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शाळेसाठी किचन रूम तसेच संरक्षण भिंत उभारून देण्याचे आश्वासन दिले.या सोबतच शाळेसाठी रोख रक्कम २५०० रुपये देऊन शाळेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.या शालेय भेटी प्रसंगी ग्रामसेवक श्री.जुगदर, सरपंच श्री.बाळासाहेब सत्वधर,ग्रामपंचायत सदस्य श्री.रमेश पवार, मुख्याध्यापक पठाण मुखतार सर,सहशिक्षिका श्रीमती हंगे सुवर्णमाला, ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी पालकांनी सक्रियसहभाग घ्यावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.या भेटीमुळे शाळेच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल,असा विश्वास ग्रामस्थ व पालकांनी व्यक्त केला.



