बोरगाव येथे श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी
दि.६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील बोरगाव बु. येथे महाराजाधिराज राज राजेश्वर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्यसाधून आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भगवान गाते सर तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जगन्नाथ होळकर,लक्ष्मण होळकर, पांडुरंग गाढवे,परमेश्वर खडके,मधुकर भूतकर, आश्रुबा भूतकर,विठ्ठल लोंढे,मधुकर गाते,बन्सी निंगुळे,नवनाथ गाते, बारीकराव होळकर,बन्सी होळकर,अशोक निंगुळे, दगडू निंगुळे, राजेंद्र निंगुळे, भिवाजी होळकर,श्रीराम निंगुळे,नीलेश निंगुळे, बबन निंगुळे,विष्णू निंगुळे तसेच सकल धनगर समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये महाराजांच्या पराक्रमाचा थोडक्यात इतिहास दीपक होळकर यांनी सांगितला व समाजातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.सदरीलकार्यक्रमास आयोजक म्हणून समाधान गाते,निखिल मुसळे,अँड.उत्तरेश्वर निंगुळे,गोपाळ देव निंगुळे, दीपक होळकर(अध्यक्ष अहिल्या प्रबोधिनी मंच), गणेश गुरव,हनुमंत बोराडे यांनी कार्यक्रम आयोजित करून राज्याभिषेक सोहळा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.



