स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व,सन्मानपत्र,रोख पारितोषिक व फिरत्या चषकासह दोन्ही गटातून प्रथम क्रमांक पटकावला

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] या शाळेतील विद्यार्थ्यांनी धारूर येथील कै.भास्करराव शिनगारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व व वादविवाद स्पर्धमध्ये घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेच्या दोन्ही गटातून प्रथम पारितोषिक पटकावून शाळेच्या सांस्कृतिक विभागामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून स्वरा विठ्ठल बोराडे हिने तर मोठ्या गटातून वादविवाद स्पर्धेमध्ये आदित्य हनुमंत सूर्यवंशी व संस्कृती भारत जाधव त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच मानसी धनराज सूर्यवंशी हिला सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले तेव्हा याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा जीवन विकास शिक्षक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी.बी.गदळे, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक मौला सौदागर,पालक भारत जाधव,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा शैलाताई इंगळे,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदींनी सन्मानपत्र,रोख पारितोषिक व फिरते चषक देऊन सत्कार केला.
कै.भास्करराव शिनगारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त धारूर येथे दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] केज या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही गटातून घवघवीत यश संपादन केले. ५ वी ते ७ वी गटातून वक्तृत्व स्पर्धेत स्वरा विठ्ठल बोराडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. बक्षिसाचे स्वरूप रोख ३००० रुपये प्रमाणपत्र व चषक तसेच ८ वी ते १० वी गटातून वादविवाद स्पर्धेत चि.आदित्य हनुमंत सूर्यवंशी याने अनुकूल व संस्कृती भारत जाधव हिने प्रतिकूल बाजू मांडून प्रथम क्रमांक पटकावला बक्षिसाचे स्वरूप रोख ५००० रुपये प्रमाणपत्र व चषक संपादन केले. तसेच मानसी धनराज सूर्यवंशी हिला सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.वरील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सहशिक्षक दत्ता सत्वधर सर व प्रबोधकांत समुद्रे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रबोधकांत समुद्रे यांनी मानले.


