
केज/प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित,माऊली विद्यालय जवळबन येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील अज्ञान दूर करणाऱ्या सावित्रीबाईंच्या कार्याला याप्रसंगी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जागवल्या आठवणी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात आणि महिलांच्या उत्थानासाठी जो संघर्ष केला,त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सावित्रीबाई नसत्या तर आज स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली नसती, अशा भावना विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून मांडल्या.अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईं च्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकून त्यांच्या त्यागाचा गौरव केला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने श्री.हजारे शिवाजी(अप्पा)भिवाजी, श्री.सोळंके एस.डी,श्री. देशमुख आर.आर,श्री. निकम ए. एम,श्री.पवार एल.एफ यांच्यासह इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला.अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला.



