विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत सोमनाथ बोरगाव माध्यमिक विद्यालयाचा संघ अजिंक्य

अंबाजोगाई / प्रतिनिधी
14 वर्षे वयोगटाच्या मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेत श्रीदत्त माध्यमिक विद्यालय सोमनाथ बोरगाव या संघाची प्रथम आल्याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बीड येथील छत्रपती संभाजी राजे क्रीडा संकुल येथे विभागीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत श्रीदत्त माध्यमिक विद्यालय सोमनाथ बोरगाव या विद्यालयाचा 14 वर्ष वयोगटातील मुलींचा संघ अजिंक्य राहिला असून त्यांची निवड राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धेसाठी विभागातून सात संघ उपस्थित होते. अंतिम सामना छत्रपती संभाजी नगर ग्रामीण यांच्याबरोबर ही अटीतटीची लढत झाली. हा सामना दोन शून्याने विद्यार्थ्यांनी जिंकला.
यशस्वी संघाचे अभिनंदन वेणुताई चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव राजपाल लोमटे उपाध्यक्ष सतीश नाना लोमटे मुख्याध्यापक भागवत हावळे सोमनाथ बोरगाव येथील उद्धव तात्या सोमवंशी यांनी केले आहे.
या संघाला शाळेतील क्रीडा शिक्षक टी एन काळे काकडे सर चोपडे सर शिरसाट सर राठोड सर बोबडे सर श्रीमती मोरे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी जाधव साखरे शिंदे राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.



