सामाजिक

श्याम विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नवनाथ पाळवदे सर यांचा भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न

केज/प्रतिनिधी

श्याम विद्यालयाचे ज्येष्ठ व आदर्शशिक्षक श्री.नवनाथ पाळवदे सर यांच्या सेवापुर्ती निमित्ताने श्याम विद्यालय,शाम कनिष्ठ महाविद्यालय व शाम गदळे कला,विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक गौरवपूर्ण सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला.या निरोप समारंभास संस्थेचे मार्गदर्शक सखाहरी तात्या गदळे,प्राचार्या सौ. जयश्री शरद गदळे,संकेत पाळवदे,मुख्याध्यापक अनंतराव सारूक सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डोईफोडे सर यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची सुरुवात केली.यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पाळवदे सरांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत व आदर्श सेवा कार्याचा गौरव केला.

यावेळी ठोंबरे सर,डी.बी. भालेराव सर,बी.एस.मुंडे सर,भोसले सर यांनी आपल्या मनोगतातून पाळवदे सर हे शिस्तप्रिय, विद्यार्थी प्रिय व सहकाऱ्यांना सदैव प्रेरणा देणारे शिक्षक असल्याचे सांगितले.त्यांच्या अध्यापन पद्धतीमुळे असंख्य विद्यार्थी घडले असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.प्राचार्या सौ. जयश्री शरद गदळे यांनी सविस्तर मनोगतात पाळवदे सरांचे शैक्षणिक, सामाजिक व नैतिक योगदान अधोरेखित करत त्यांच्या पुढील आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सखाहरी तात्या गदळे यांनी पाळवदे सरांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.संस्थेच्या जडणघडणीत पाळवदे सरांचा मोलाचा वाटा असून त्यांची सेवा ही पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे,असे त्यांनी सांगितले.

सत्कारास उत्तर देताना श्री.नवनाथ पाळवदे सर यांनी आपल्या भावना व्यक्त करत संस्थेने, सहकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षकी पेशा ही केवळ नोकरी नसून समाज घडवण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या शेवटी नागरगोजे बंडू सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!