
केज/प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.घुले शुभांगी सुरेश हिला कांस्यपदक मिळाले आहे.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाला कांस्यपदक प्राप्त झाले.
कांस्यपदक प्राप्त विद्यार्थ्यांनी कु.घुले शुभांगी सुरेश हिचा सत्कार बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ.कविता गित्ते-कराड मॅडम,संस्थेचे उपाध्यक्ष राजेश कापसे सर,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


