
केज/प्रतिनिधी
दि.३० डिसेंबर २०२५ रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालय,केज व साने गुरुजी निवासी विद्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ व्या तालुका स्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदविला असून या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठा वर कार्यक्रमाचे अध्यक्ष साने गुरुजी संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता कराड मॅडम, प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण मॅडम,केंद्र प्रमुख संजय चवरे,केदार सर,वेदपाठक सर हे होते या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनिल केंद्रे यांनी सांगितले की,या विज्ञान प्रदर्शनात शासनाचा फार उद्दाते हेतू असतो.

विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करून वैज्ञानिक दृष्टीकोनाचा वापर आत्मनिर्भर भारतासाठी बुध्दीच्या जोरावर चौकसपणा, जिज्ञासा व हार्डवर्क करणे खुप महत्वाचे आहे गरज ही शोधाची जननी आहे. माणसाच्या सततच्या गरजा मुळे अनेक महत्त्वाचे शोध लागले आहे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती लहाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सुवर्णा सिरसट यांनी मानले हे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन बुधवार पर्यंत चालणार आहे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



