
केज/प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली घेण्यात आले.दिनांक २९ -१२ – २०२५ रोजी भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान वाचन पंधरवडा चा समारोप करण्यात आला.
यावेळी ग्रंथप्रदर्शना चाही समारोप करण्यात आला.यावेळी वाचक, सभासद,हितचिंतक, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.दिनांक २७-१२ – २०२५ रोजी गुरु गोविंदसिंह जयंती व वीर बालक दिन ग्रंथवाचन, व्याख्यान व ग्रंथप्रदर्शन घेवून साजरा करण्यात आला.सर्वप्रथम गुरु गोविदसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन व पुजन करण्यात आले.त्यानंतर श्रीराम गायकवाड यांचे थोडक्यात व्याख्यान झाले.सार्थक गायकवाड, कृष्णा गिरी,ज्ञानेश्वर गायकवाड, आनंद भैय्या गायकवाड यांनी ग्रंथ वाचन केले.ग्रंथ प्रदर्शनाला दादासाहेब गायकवाड,माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव, नारायणभाऊ गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगन गायकवाड,अरुण गायकवाड यांच्या सह वाचक,हितचिंतक,ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

दिनांक २६ – १२ – २०२५ रोजी भारतीय स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला.यावेळी रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले,डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून स्त्री – मुक्ती विषयी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.दि. २५ – १२ – २०२५ रोजी माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले. ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाडयांचे थोडक्यात व्याख्यान झाले.
या विविध कार्यक्रमाला डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या सह माजीसरपंच रामराजे गायकवाड,रावसाहेब जाधव,ए.बी. गायकवाड, कृष्णा गिरी,बाळासाहेब गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड,सार्थक गायकवाड,श्रीराम गायकवाड,छगन गायकवाड,नारायणभाऊ गायकवाड,दादासाहेब गायकवाड, एस.के.वैरागे, रविंद्र गायकवाड, शशीकांत गायकवाड, रोहन गायकवाड,संस्कार गायकवाड,वेदिका गायकवाड,शिवम गायकवाड,प्रथमेश गायकवाड,राजराणी गायकवाड,मधुरा तट, गौरी गायकवाड,वैष्णवी गायकवाड,मयुर गायकवाड, यश गायकवाड यांच्यासह वाचक, हितचिंतक,विद्यार्थी, युवक,जेष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती.



