सामाजिक

रोहन गलांडे यांनी आमरण उपोषणाचे निवेदन देताच केज तालुक्यातील चिंचोली माळी घरकुलाचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे म्हणून रोहन गलांडे पाटील यांनी दि.९ डिसेंबर २०२५ रोजी आमरण उपोषणाचे निवेदन दिले होते व उद्या रोहन गलांडे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत त्या अगोदरच एक मागणी मान्य केली आहे व केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील घरकुलाचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे .

तसेच केज तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचे हप्ते जमासुध्दा करण्यात आले आहे तरी उद्या एक मागणी मान्य झाली असली तरी इतर मागण्या मान्य होत नाहीत त्यासाठी उद्या रोहन गलांडे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत.केज तालुक्यातील विहीर व गायगोठा,घरकुलाचे हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी रोहन गलांडे यांनी केली होती.त्यांची ही एक मागणी मान्य करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!