सांस्कृतीक

केज शहरामध्ये मकर संक्रांतीचा उत्साह ओसंडून वाहताना तिळगूळ घ्या,गोड गोड बोलाच्या शुभेच्छा देऊन मकर संक्रांत साजरी 

केज/प्रतिनिधी

केज शहरासह परिसरात मकर संक्रांतीचा सण आज अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तिळगूळ घ्या,गोड गोड बोला म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी स्नेहाचा संदेश दिला. शहरात सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी आणि घराच्या गच्चीवर पतंगांची रंगत पाहायला मिळाली.

बाजारपेठेत खरेदीची लगबग अन् सुवासिनींचे पूजन मकर संक्रांत सणा निमित्त मागील आठ दिवसांपासून केजच्या मंगळवार पेठ आणि कानडी रोड भागात मोठी गर्दी होती.सुगडे,ऊस,बोरं, गाजर आणि तिळाच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलून गेली होती.सकाळी सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने सुगडांचे पूजन केले.दुपारी ३ वाजेपासून पूजेचा मुहूर्त असल्याने शहरातील विविध मंदिरांत महिलांची वाणदेण्यासाठी आणि हळदी-कुंकवासाठी मोठी लगबग दिसून आली.

आकाशात पतंगांची झुंज 

नायलॉन मांजाला फाटा

तरुणाईमध्ये पतंगबाजी चा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला.केज शहराच्या विविध भागांतील घराच्या गच्ची वरून “काट रे काट” च्या घोषणा ऐकू येत होत्या. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे,प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केजच्या नागरिकांनी ‘नायलॉन मांजा’ वापरणे टाळल्याचे चित्र दिसले.

मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

केज शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये मकर संक्रांतीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शिक्षक कॉलनी,हनुमान मंदिर,गणपती मंदिर, राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिर व इतर देवस्थाने शुक्रवार पेठेतील बालाजी मंदिर, देशपांडे गल्लीतील समर्थ मठ,वकीलवाडी तील हनुमान मंदिर.

या सर्व ठिकाणी विशेष पूजा-अर्चा करण्यात आली.मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दानधर्माला महत्त्व असल्याने अनेकांनी गरजूंना मदत केली.सूर्यदेवाला तिळाचे लाडू आणि गुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!