
केज/प्रतिनिधी
येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१,आनंदगाव ता. केज येथे सन २०२५-२६ या चालू गळीत हंगामात अवघ्या ५४ दिवसांत तब्बल ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. कारखान्याचा बारावा गळीत हंगाम सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असून, नियोजनबद्ध व्यवस्थापना मुळे गाळपाचे उद्दिष्टवेगाने साध्य होत आहे,अशी माहिती कारखान्याचे चेअरमन खा.बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
दररोज सरासरी सुमारे ९ हजार टन ऊस गाळप होत असून,शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेवर आणि अडथळे विना गाळप मिळत असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.गळीत हंगामाच्या सुरुवाती पासूनच काटेकोर नियोजन,यंत्रसामग्रीची तत्पर देखभाल आणि कामगारांचे नियोजन यामुळे गाळपाचा वेग कायम ठेवण्यात कारखाना प्रशासनाला यश आले आहे.ऊस गाळपाबरोबरच कारखान्यांतर्गत कार्यरत असलेला २६ मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पही प्रभावीपणे सुरू आहे.आज अखेर या प्रकल्पातून एकूण १कोटी ९३ लाख ६४ हजार २०० युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून, त्यापैकी ७२ लाख ५४ हजार ९०० युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात (एक्सपोर्ट) करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला असून, ऊर्जानिर्मिती क्षेत्रातही येडेश्वरी साखर कारखान्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. कारखान्याच्या कार्यक्षम व दूरदृष्टीपूर्ण व्यवस्थापना मुळे गाळप आणि वीज निर्मिती या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती होत आहे.याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. आगामी काळातही अशीच कामगिरी कायम राखत शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करण्याचा संकल्प कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे.
डिस्टिलरीत मोठी झेप
डिस्टिलरी विभागाकडील गळीत हंगाम २०२५-२६ चे प्रत्यक्ष उत्पादन दि.५ नोव्हेंबर २०२५ रोजीचालू होऊन २८३६४ मे.टन सिरपपासून ७९,९७,२०४ ब.ली.आर.एस.चेउत्पादन झालेले आहे.तसेच ५८३४ मे.टन बी हेवी पासून १६,९६,९४० ब.ली.आर.एस असे एकूणआर.एस.९६,९४, १४४ चे उत्पादन झाले आहे.सदर उत्पादित सिरप आर.एस.पासून ६३,८९,९३२ ब.ली. इथेनॉल व बी हेवी आर.एस.पासून २,७४,६०८ इथेनॉल असे एकूण ६६,६४,५४०ब.ली. चे उत्पादन झाले आहे. उर्वरितआर.एस.२६,९६,३७७ लाख लिटर आर.एस.साठा शिल्लक आहे.उत्पादित झालेल्या इथेनॉल पैकी ४९,९५, ००० ब.ली.ची ऑईल कंपनीना विक्री झालेली असून आज उर्वरित १६,६९,५४० ब.ली. इथेनॉल शिल्लक आहे.



