केज वकील संघाचे नव निर्वाचित अध्यक्ष अॕड.एम.एस लाड उपाध्यक्ष अॕड.एस.एल गलांडे तर सचिव अॕड. एस.एन अंबाड यांची निवड .

केज/प्रतिनिधी
केज वकील संघाची निवडणूक नुकतीच पार पडली असुन अध्यक्ष पदी अॕड.एम.एस लाड उपाध्यक्षपदी अॕड.एस.एल गलांडे तर सचिव पदावर अॕड.एस.एन अंबाड यांची निवड करण्यात आली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की,दि.18 सप्टेंबर रोजी केज वकील संघाची निवडणूक पार पडली.
अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अॕड.एम.एस लाड यांना 82 तर अॕड.एस.वाय मुंडे यांना 64 मते मिळाली 18 मताने अॕड.एम.एस लाड विजयी झाले आहेत.तर उपाध्यक्ष पदासाठी अॕड.गलांडे एस.एल यांना 99 मते मिळाली तर अॕड.ए.बी.सोनवणे 50 मते मिळाली आहेत अॕड.एस.एल गलांडे 49 मतांनी विजयी झाले आहेत.तर सचिव पदासाठी अॕड.एस.एनअंबाड यांना 78 मते मिळाली तर अॕड.इतापे पी.डी यांना 69 मते मिळाली अॕड.एस.एन अंबाड 9 मताने विजयी झाले आहेत.
कोषाध्यक्ष पदावर अॕड.एस.एस देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच सह सचिव पदावर अॕड.सिरसाट तर ग्रंथपाल म्हणून अॕड.जे.जी बारगजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॕड.एस.सी जाधव यांनी कामकाज पाहिले तर त्यांना अॕड.डब्ल्यु.ए शेख व अॕड.पी.ए हुंबे यांनी सहकार्य केले. केज वकील संघाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
