कृषीसामाजिक

अतिवृष्टीच्या पंचनाम्यात दुजाभाव कराल तर याद राखा, खा.बजरंग सोनवणे यांचा इशारा,पाटोदा, आष्टी तालुक्यात केली नुकसानीची पाहणी

बीड/प्रतिनिधी

मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे.शेतकरी संकटात सापडला आहे त्यांना शक्य तितकी मदत करणे गरजेचे आहे.असे असताना काही अधिकारी पंचनाम्यात दुजाभाव करण्याचे पातक करत असल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्यांनी ओल्या दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यां सोबत माणूसकीने वागावे, दुजाभाव कराल तर याद राखा, असा इशारा खा.बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील हे दि.२६, शुक्रवारी रोजी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी तील नुकसान पाहणी दौऱ्यावर आले होते. यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी सकाळी पाटोदा शहरात भेटी देऊन तेथील पुरस्थिती ने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यानंतर ते कारेगाव येथे नुकसानी च्या पाहणीसाठी पोंहचले.या ठिकाणी जेष्ठ नेते जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पाटोदा तालुकाध्यक्ष आनंद जाधव,माजी आमदार संगीता ठोंबरे,सुशीला मोराळे,राजेसाहेब देशमुख यांची उपस्थिती होती.

यानंतर त्यांनी डोंगरकिन्ही येथे भेट दिली.तर आष्टी तालुक्यातील धामनगाव कडा,चोभा निमगाव, शिराळ या गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी अण्णासाहेब चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे,राम खाडे,आष्टी तालुका अध्यक्ष सुनील नाथ,अमोल तरटे,शेख रिझवान,संजय थोरवे, अशोक पोकळे, जगनाथ ढोबळे,राहुल काकडे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले की,जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे.

लोक एकमेकांना मदतीचा हात देवून माणूसकी दाखवत आहेत.अशापरिस्थितीत माणूसकी दाखविणे आवश्यक आहे. असे असताना काही अधिकारी ,कर्मचारी पंचनाम्यात  दुजाभाव करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. असे असेल तर ही पध्दत चुकीची आहे. पंचनामे योग्य पध्दतीने झाले नाही अथवा दुजाभाव केला तर सामान्य शेतकरी मदती पासून वंचित राहू शकतात.अशा वेळी अधिकारी,  कर्मचाऱ्यांनी  दुजाभाव न करता पंचनामे करावेत.

जर पंचनाम्यात दुजाभाव केला अशी तक्रार आली तर याद  राखा, दुजाभाव करण्याचे पातक करू नका असा सल्लाही खा.बजरंग सोनवणे यांनी दिला. दरम्यान, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा सरसकट मदत द्यावी , जिथे शेतात माती राहिली नाही,पिके सडलेली दिसत आहेत, तिथे पंचनामे कशाचे करायचे,इतके तरी सत्ताधारी मंडळींनी लक्षात घेणे आवश्यक आहे,असेही खा. बजरंग सोनवणे म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!